तुला शोधताना मी फार दूर गेले
तू मात्र इथेच मी मिळालास
मी मात्र हरवून गेले।
तू नसताना असल्याचा भास होतो
तू बघताना प्रेमाचा आभास होतो
या सांजवेळी तुझी आठवण येते
अणि मला माझ्या प्रेमाचाच त्रास होतो
smruti
Thursday, September 22, 2011
Saturday, January 1, 2011
पाऊस
सध्या अमेरिकेमध्ये पावसाळा सुरु आहे . आज एकदम मुंबईची आठवण आली. खूप धो धो पाऊस, हिर्वीगच झाडी, गार वारा, एक वेगळ्याच प्रकारचा सुवास. ट्रेन मधून प्रवास करताना वाऱ्याबरोबर उडणारे पावसाचे तुषार. समुद्रावर गेल तर उंच उडणाऱ्या फेसाळ लाटा, नरल्याच्या झाडाची हलणारी पाने, चहा, गरम गरम बटाटे वडे.......अहाहा..........
पहिल्या पावसात भिजण्याची मजा काही औरच आहे. लहानपणी साचलेल्या पाण्यात कागदाची होडी करून सोडायची, साचलेल्या छोट्याश्या पाण्याच्या तळ्यात उडी मारून सगळीकडे पाणी उडवायचं हे सगळ आठवून सुद्धा परत लहान व्हावस वाटत. डोळे मिटून पाऊस म्हटलं की पहिल्यांदा गार वारा अंगाला झोंबतो, पावसाचे टपोरे थेंब तोंडावर पडतात, हिरव्या गच्च पानात बांधलेल्या सोन्त्ताक्याचा वास नाकात शिरतो.
पहिल्यांदा पाऊस पडला की कोरड्या जमिनीवर पडलेल्या पावसामुळे येणारा मातीचा सुवास कुठल्याच वासाशी तुलना करू शकत नाही. माझ एक आवडत झाड होत. ते पावसामध्ये एवढ सुंदर दिसायचं. काळा बुंधा आणि हिराविगच्च पान..........पाऊस पडून गेल्यावर झाडाखालून गेल्यावर पण उडणार पाणी....श्रावनात चालणारा उन पावसाचा खेळ.......त्यामध्ये चमकणारे , चम चम करणारे गवत.....हिरव्या पानामध्ये लपलेले अनंताचे पांढरे पावसात भिजणारे फुल ...किती वर्णन केले तरी कमीच आहे ......
इथे पण पाऊस पडतो , सगळीकडे हिरवगार होत पण भिजताच येत नाही......पावसाला भेटताच येत नाही...... म्हणून पाऊस पडला तरी कोरडच राहायला होत
Subscribe to:
Posts (Atom)