पहिल्या पावसात भिजण्याची मजा काही औरच आहे. लहानपणी साचलेल्या पाण्यात कागदाची होडी करून सोडायची, साचलेल्या छोट्याश्या पाण्याच्या तळ्यात उडी मारून सगळीकडे पाणी उडवायचं हे सगळ आठवून सुद्धा परत लहान व्हावस वाटत. डोळे मिटून पाऊस म्हटलं की पहिल्यांदा गार वारा अंगाला झोंबतो, पावसाचे टपोरे थेंब तोंडावर पडतात, हिरव्या गच्च पानात बांधलेल्या सोन्त्ताक्याचा वास नाकात शिरतो.
पहिल्यांदा पाऊस पडला की कोरड्या जमिनीवर पडलेल्या पावसामुळे येणारा मातीचा सुवास कुठल्याच वासाशी तुलना करू शकत नाही. माझ एक आवडत झाड होत. ते पावसामध्ये एवढ सुंदर दिसायचं. काळा बुंधा आणि हिराविगच्च पान..........पाऊस पडून गेल्यावर झाडाखालून गेल्यावर पण उडणार पाणी....श्रावनात चालणारा उन पावसाचा खेळ.......त्यामध्ये चमकणारे , चम चम करणारे गवत.....हिरव्या पानामध्ये लपलेले अनंताचे पांढरे पावसात भिजणारे फुल ...किती वर्णन केले तरी कमीच आहे ......
इथे पण पाऊस पडतो , सगळीकडे हिरवगार होत पण भिजताच येत नाही......पावसाला भेटताच येत नाही...... म्हणून पाऊस पडला तरी कोरडच राहायला होत